सलमान-कतरिनाची 'लेट नाईट ड्राईव्ह'
By Admin | Updated: February 12, 2016 17:24 IST2016-02-12T17:24:54+5:302016-02-12T17:24:54+5:30
सलमान खान आणि कतरिना कैफमधील प्रेमाचे नाते संपले असले तरी, आजही कतरिनाला सलमानचाच आधार वाटतो.

सलमान-कतरिनाची 'लेट नाईट ड्राईव्ह'
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - सलमान खान आणि कतरिना कैफमधील प्रेमाचे नाते संपले असले तरी, आजही कतरिनाला सलमानचाच आधार वाटतो. रणबीर कपूरशी ब्रेक अप झाल्यानंतर एकाकी पडलेल्या कतरिनाला सलमान सध्या भावनिक आधार देत आहे.
बॉलिवुड लाईफ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार कतरिनाने अलीकडे एका चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरण थांबवून काहीवेळ सलमान सोबत घालवला. चित्रीकरण संपल्यानंतरही ती सलमानसोबत होती. सलमानसोबत चर्चा केल्यानंतर कतरिनाने आपल्या ड्रायव्हरला घरी पाठवून दिले. त्यानंतर रात्री उशिरा चित्रीकरण संपल्यानंतर सलमानने तिला आपल्या गाडीतून पिकअप केले.
एकेकाळची सलमानची प्रेयसी संगीता बिजलानी आजही त्याची चांगली मैत्रीण आहे. अनेकदा ती सलमानच्या घरी दिसते. ऐश्वर्याचा रायचा अपवाद वगळता बॉलिवुडच्या या दबंगच्या गर्लफ्रेंडस प्रेमाचे नाते संपल्यानंतरही त्याच्यासोबत मैत्री टिकवून आहेत.