सलमान जॅकलीनवर भडकला
By Admin | Updated: June 7, 2015 23:38 IST2015-06-07T23:38:11+5:302015-06-07T23:38:11+5:30
‘किक’ सिनेमावेळी सलमानच्या हृदयात स्थान मिळवलेली जॅकलीन फर्नांडिस आता सलमानला नकोशी झाली आहे.

सलमान जॅकलीनवर भडकला
‘किक’ सिनेमावेळी सलमानच्या हृदयात स्थान मिळवलेली जॅकलीन फर्नांडिस आता सलमानला नकोशी झाली आहे. त्यांच्यातील या दुराव्याचे कारण समजलेले नसले तरीही सल्लूमियॉँ जॅकलिनवर भडकलेले आहेत, हे मात्र नक्की. दुबईमध्ये आयोजित बॉलीवूड पुरस्कार सोहळ्यादरम्यान सलमानला ‘किक २’ बाबत विचारले असता तो म्हणाला, की मी साजिद खानसोबत काम करायला तयार आहे. पण त्यात जॅकलीनला जागा नाही. आम्ही जॅकलीनऐवजी दुसऱ्या हीरोईनला शोधू.