सलमान-गोविंदा बनणार ‘पार्टनर’!!

By Admin | Updated: November 11, 2016 02:35 IST2016-11-11T02:35:12+5:302016-11-11T02:35:12+5:30

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि गोविंदा पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलमान व गोविंदाचा सुपरहिट चित्रपट ‘पार्टनर’च्या सीक्वलची तयारी सुरू झाली

Salman-Govinda to become 'partner' !! | सलमान-गोविंदा बनणार ‘पार्टनर’!!

सलमान-गोविंदा बनणार ‘पार्टनर’!!

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि गोविंदा पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलमान व गोविंदाचा सुपरहिट चित्रपट ‘पार्टनर’च्या सीक्वलची तयारी सुरू झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यात सलमान व गोविंदा यांच्या भूमिका कायम ठेवण्यात आल्या आहेत. 2007 साली डेव्हिड धवन यांनी ‘पार्टनर’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. सलमान खान व गोविंदा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला होता. गोविंदा व सलमान एकत्र आल्यास दोघांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. यापूर्वी 2011मध्ये देखील पार्टनरचा सीक्वलच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र चर्चे व्यतिरिक्त काहीच झाले नाही. सलमान व गोविंदा यांच्यात काही दिवसांपूर्वी बिनसल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता ही गोष्ट बरीच जुनी झाली असून यात त्यांचे संबध पूर्ववत झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Salman-Govinda to become 'partner' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.