साजीदकडून सलमानला ३ कोटींचे गिफ्ट
By Admin | Updated: August 1, 2014 23:54 IST2014-08-01T23:54:41+5:302014-08-01T23:54:41+5:30
किकचा निर्माता-दिग्दर्शक साजीद नादियाडवाला सलमान खानवर जाम खुश असून तो त्याला तीन कोटी किमतीची रोल्स रॉयस ही कार गिफ्ट देणार आहे.

साजीदकडून सलमानला ३ कोटींचे गिफ्ट
किकचा निर्माता-दिग्दर्शक साजीद नादियाडवाला सलमान खानवर जाम खुश असून तो त्याला तीन कोटी किमतीची रोल्स रॉयस ही कार गिफ्ट देणार आहे. आजवर सलमान त्याच्या मित्रांना महागडे गिफ्टस् देत आला आहे; पण ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा त्याला कोणीतरी एवढे महागडे गिफ्ट देत आहे. सलमान आणि साजीद चांगले मित्र आहेत. सूत्रांनुसार किकच्या रेकॉर्डतोड यशाने साजीद खूप आनंदात आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे सलमानला ही महागडी लक्झरी कार गिफ्ट देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. सलमानला हे महागडे गिफ्ट देऊन त्याच्या चांगल्या अभिनयासाठी आभार मानण्याचा हा साजीदचा प्रयत्न आहे. किकने फक्त सहा दिवसांत १४८ कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट लवकरच २०० कोटींचा पल्ला गाठेल, असेही म्हटले जाते.