सलमानवर चाहते नाराज
By Admin | Updated: April 26, 2015 23:30 IST2015-04-26T23:30:45+5:302015-04-26T23:30:45+5:30
अभिनेता सलमान खान सध्या पहलगाममध्ये आहे. तो आगामी ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमाचे शूटिंग करतोय. येथे सलमानला चाहते आणि पर्यटकांच्या रोषाला सामोरे

सलमानवर चाहते नाराज
अभिनेता सलमान खान सध्या पहलगाममध्ये आहे. तो आगामी ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमाचे शूटिंग करतोय. येथे सलमानला चाहते आणि पर्यटकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानचे चाहते त्याच्यावर रागावले आहेत. सलमानची एक झलक बघण्यासाठी काही लोक शूटिंग सेटवर पोहोचले होते. मात्र सलमानच्या सिक्युरिटी गाडर््सनी त्यांना मारहाण करून तेथून पळवून लावले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सलमानने विनम्रता दाखवली आणि लांबून चाहत्यांना हात दाखवला.