सलमान-आमीर साकारणार 'अंदाज अपना अपना २'

By Admin | Updated: June 15, 2016 20:56 IST2016-06-15T16:28:49+5:302016-06-15T20:56:36+5:30

हिंदी चित्रपटांतील विनोदी चित्रपटांची यादी केली तर 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट पहिल्या दहांमध्ये येईल याबाबत काहीच शंका नाही. याचं चित्रपटाचा सिक्वल येत आहे.

Salman-Amir will make 'Aaz apne apne 2' | सलमान-आमीर साकारणार 'अंदाज अपना अपना २'

सलमान-आमीर साकारणार 'अंदाज अपना अपना २'

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ : हिंदी चित्रपटांतील विनोदी चित्रपटांची यादी केली तर 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट पहिल्या दहांमध्ये येईल याबाबत काहीच शंका नाही. याचं चित्रपटाचा सिक्वल येत आहे. यामध्ये सलमान आणि अमीर खानचं मुख्य भुमिकेत झळकणार असल्याचे वृत्त आहे. तिकिटबारीवर सरासरी यश मिळवलेल्या या चित्रपटाने लोकांना मनसोक्त हसवलं होतं. यामधील तेजा, क्राइम मास्टर गोगो ह्या व्यक्तिरेखा आजही लोकांच्या ओठावर रेंगाळत आहेत. 
 
आमीर खान, सलमान खान, रविना, करिष्मा, शक्ती कपूर आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना तितकचं खळखळून हसवतो. २२ वर्षांपूर्वी केलेल्या या चित्रपटाची भुरळ प्रत्येकाला अद्याप कायम असल्याचे दिसते आहे. दुसऱ्या भागातही सर्व जुनीच स्टार कास्ट असल्याचे वृत्त आहे. अंदाज अपना अपना २ चे कथानक विवेक सोनी आणि हार्दिक मेहतायांनी मिळून लिहले आहे, कॉमेडीने भरलेल हे कथानक चित्रपट निर्मात्याच्या पसंतीस उतरले आहे. 
 
 
राजकुमार संतोषीचे दिग्दर्शन असलेल्या अंदाज अपना अपनाचे काम तब्बल तीन वर्ष अडकले होते. चित्रपटातील कलाकार त्यांच्या इतर प्रोजेक्टमध्ये अडकल्यामुळे त्यांना या चित्रपटाला वेळ देता येत नव्हता. पण आमीरने या सर्वांना एकत्र आणले आणि अखेर १९९४मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ४०व्या फिल्मफेअर पुरस्कारात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट (विनय कुमार सिन्हा), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (राजकुमार संतोषी), सर्वोत्कृष्ट अभिनेता (आमीर खान) आणि सर्वोत्कृष्ट विनोद कलाकार (शक्ती कपूर) या विभागांमध्ये नामांकने मिळाली होती.

Web Title: Salman-Amir will make 'Aaz apne apne 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.