सैफिना जाणार ‘बेबीमून’ला?
By Admin | Updated: July 25, 2016 02:41 IST2016-07-25T02:41:42+5:302016-07-25T02:41:42+5:30
सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांना आता डिसेंबरमध्ये त्यांचे पहिले बाळ मिळणार आहे. सध्या सैफ त्याची पत्नी बेबोची काळजी घेण्यात खूप व्यस्त आहे

सैफिना जाणार ‘बेबीमून’ला?
सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांना आता डिसेंबरमध्ये त्यांचे पहिले बाळ मिळणार आहे. सध्या सैफ त्याची पत्नी बेबोची काळजी घेण्यात खूप व्यस्त आहे. ते दोघे आता ‘बेबीमून’बद्दलही विचार करत आहेत. सोनम कपूरचा चित्रपट ‘वीरें दी वेडिंग’चे शूटिंग पूर्ण झाल्यावर सैफ तिला बेबीमूनसाठी कुठेतरी घेऊन जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग आणि बाकी सर्व जर व्यवस्थितपणे पार पडले तर सैफ आणि करिना एका मिनी व्हॅकेशनसाठी डिसेंबरअगोदर जातील, असे सूत्रांकडून कळत आहे.