सई ताम्हणकरची मेलबर्न मिडनाइट
By Admin | Updated: March 6, 2016 01:31 IST2016-03-06T01:31:31+5:302016-03-06T01:31:31+5:30
बोल्ड अन् बिनधास्त अभिनयाने सर्वंाच्या काळजाचा ठोका चुकविणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मेलबर्नमध्ये नाईट आऊट करीत आहे की काय, असेच दिसते

सई ताम्हणकरची मेलबर्न मिडनाइट
बोल्ड अन् बिनधास्त अभिनयाने सर्वंाच्या काळजाचा ठोका चुकविणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मेलबर्नमध्ये नाईट आऊट करीत आहे की काय, असेच दिसते. सईने नुकतेच एक छायाचित्र अपलोड केले असून ती म्हणते, इट्स पास्ट मिडनाईट इन मेलबर्न. मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये कदाचित सईने हे छायाचित्र काढले असावे. ब्लॅक टॉप अन् ब्ल्यू जीन्समध्ये सई एकदम कुल दिसत आहे. एक हात कंबरेवर ठेवून व्हिक्टरीची पोझ देताना मस्त पाऊट करीत एकदम हटके अंदाजात सईने स्वत:ला कॅमेऱ्यात बंदिस्त करून घेतले आहे. सईच्या आजूबाजूला कोणीच दिसत नसून ती हा तिचा क्वालिटी टाईम मस्त एन्जॉय करीत असल्याचे दिसत आहे. आपण फक्त एवढेच म्हणूयात एन्जॉय सई युअर मेलबर्न मिडनाईट.