सईच्या आठवणीतले बाबा!

By Admin | Updated: October 6, 2016 02:50 IST2016-10-06T02:50:26+5:302016-10-06T02:50:26+5:30

सई ताम्हणकर आपल्याला आगामी चित्रपट 'फॅमिली कट्टा'मध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. वंदना गुप्ते यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे

Sai remembered Baba! | सईच्या आठवणीतले बाबा!

सईच्या आठवणीतले बाबा!

सई ताम्हणकर आपल्याला आगामी चित्रपट 'फॅमिली कट्टा'मध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. वंदना गुप्ते यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौटुंबिक विषयावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सईला तिच्या बाबांच्या आठवणींनी गहिवरून आले. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, सईने तिच्या बाबांना लिहिलेले हे पत्र.

प्रिय पपा,
ममाच्या माहितीप्रमाणे मी ६ महिन्यांची असताना सिग्नलचा रंग हे कारण ठरले आपल्या मैत्रीचे! ओळखीचे! मी सहा महिन्यांची होईपर्यंत तू बोटीवरच होतास, मी मोठी होत गेले, तसे तू कधीच कोणतीच कसर माझ्या लाडात पडू दिली नाहीस. तुझा उत्तम स्वयंपाक करण्याचा आणि कुठलेही काम हाती पडले, तर ते न लाजता करण्याचा रंग तंतोतंत माझ्यात उतरला आहे. बोटीवर परत जायला जेव्हा वेळ असायचा, तेव्हा तू टॅक्सी चालवायचास मुंबईत. तुझा बिल्ला मी पाहिलाय. कळायला लागले, तेव्हा समजेना या गोष्टीला कसे रिअ‍ॅक्ट व्हावे. बेचैन व्हावे की चिंतीत! तेव्हा पॅशन वगैरे शब्द माझ्या समजेच्या शब्दकोषात नव्हते. नंतर उमगले, ड्रायव्हिंग वॉज युअर पॅशन. मी आज तुला अभिमानाने सांगू इच्छिते की, पुलावरून नदी ठोकणारा आणि सरसर नदी पार करणाऱ्या तुझ्या मुलीत तुझा अ‍ॅडव्हेंचरस रंगही उतरलाय आणि एकजीव झालाय. बाकी खरे सांगायचे, तर इतर सर्व रंग माझे मीच शोधलेत, धडपडत आणि शिकत.
तुझ्याशी खूप बोलायचे राहून गेले, ही सल खूपदा बोचते, पण कधीतरी असे वाटते, जेवढे घडले तेवढेच घडायचे होते. त्याला पूर्णत्वाचा हट्ट का? माझ्या अपूर्ण गोष्टी मी माझ्या पात्रांमध्ये शोधल्यात. नेहमीच खूपशा सापडल्याही, त्यांना पूर्णत्व मिळालेही. तू मात्र, कधी सापडलाच नाहीस, पण मीही शोधणे थांबवले नाही. त्या माझ्या अपूर्ण, सलणाऱ्या, आवडणाऱ्या आणि तुला मलाच माहीत असलेल्या गोष्टी फॅमिली कट्टाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कुशीत घेतल्या मी. तेवढीच गलबलले जेवढी खऱ्या आयुष्यात गलबलते. तुला शोधत राहण्याचे काम मी प्रामाणिकपणे करत आहे.माझ्याकडे जे आहे ते मी नीट जपून ठेवेन. बरं-वाईट सगळे! मला कळत-नकळत घडविल्याबद्दल थँक यू! तू नसतानाही मी घडतच आहे, कधी तू नाहीस म्हणून, तर कधी तुला शोधत शोधत.

Web Title: Sai remembered Baba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.