साईचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

By Admin | Updated: September 19, 2016 02:11 IST2016-09-19T02:11:36+5:302016-09-19T02:11:36+5:30

‘पीके’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मै’ आणि ‘युवराज’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटात झळकलेला मराठमोळा चेहरा म्हणजे साई गुंडेवार.

Sai debut in Marathi film industry | साईचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

साईचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण


‘पीके’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मै’ आणि ‘युवराज’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटात झळकलेला मराठमोळा चेहरा म्हणजे साई गुंडेवार. साई लवकरच आपल्याला ‘अ डॉट कॉम मॉम’ या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. काही हिंदी चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोज केल्यानंतर साई आता मराठी सिनेमाकडे वळला आहे. हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने तो या सिनेमासाठी फारच उत्सुक आहे. आई आणि मुलाचे भावनिक बंध उलगडणारा हा चित्रपट आहे. यामध्ये साईने कष्टाळू आणि आईवर खूप प्रेम असलेल्या मुलाची भूमिका साकारली आहे. मुलाच्या आग्रहाखातर त्याची आई परदेशात जाते आणि तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेताना घडणाऱ्या गमती-जमती यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सीएनएक्सशी बोलताना साई म्हणतो, ‘‘मराठी चित्रपटात काम करणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी परदेशात जरी वाढलो असलो तरी कुटुंबातील संस्कारांमुळे आपल्या मराठी संस्कृतीला कधीच विसरलो नाही. परदेशात असताना मी माझ्या आई-वडिलांशी फोनवर मराठीतूनच बोलायचो. त्यामुळे मला भाषेची कधीच अडचण आली नाही. शिवाय माझी बायकोदेखील महाराष्ट्रीयनच आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीशी माझे नाते आजही घट्ट आहे.’’ साईचा मराठमोळा अभिनय प्रेक्षकांना लवकरच 'अ डॉट कॉम मॉम' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

Web Title: Sai debut in Marathi film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.