"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:23 IST2025-07-22T15:22:25+5:302025-07-22T15:23:05+5:30

सचिन पिळगावकर यांनी वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 'हा माझा मार्ग एकला' हा तो सिनेमा होता.

sachin pilgaonkar received national award at the age of 5 pandit jawaharlal nehru impressed after seeing him and gave him a rose | "पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?

"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?

महागुरु अशी ओळख असलेले उत्तम अभिनेते, डान्स, गायक, दिग्दर्शक अशी बहुगुणी सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar). त्यांनी सांगितलेले अनेक किस्से सध्या व्हायरल होत आहेत. त्यातच एक माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) यांच्यासोबतचा किस्सा. अगदी लहान वयातच अभिनयाची बाराखडी गिरवत आपल्या अनोख्या अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांना आपलंस केलं. ४ वर्षांचा असताना बालकलाकार म्हणून या नायकाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. इतकंच नाही तर देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील या बालकाराच्या अभिनयाची दखल घ्यावी लागली. काय आहे तो किस्सा?

सचिन पिळगावकर यांनी वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. १९६२ साली आलेला 'हा माझा मार्ग एकला' हा तो सिनेमा होता. त्यांच्या कामाची दखल चक्क पंतप्रधानांनाही घ्यावी लागली. या चित्रपटातील त्यांनी केलेल्या उत्तम अभिनयामुळे त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. त्यावेळी देशाचे राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन होते. चार वर्षांच्या सचिन पिळगावकर यांना त्यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच कार्यक्रमात बसलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना सचिन पिळगावकरांचा निरागसपणा आवडला. त्यांनी सचिन यांना आपल्या मांडीवर बसवलं आणि आपल्याजवळ असलेलं गुलाबाचं फूल त्यांना दिलं होतं. 

सचिन पिळगावकर यांना वयाच्या केवळ  पाचव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या पुरस्काराला त्यांच्या आईने काळ्या रंगाची शेरवानी शिवून घेतली होती. खास बूटही आणले होते. जेव्हा स्टेजवरुन सचिन यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा एवढ्याशा मुलाला पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. पंडित नेहरुंना तर लहान मुलं प्रिय होती हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या कोटवर नेहमी गुलाबाचं फूल असायचंच. लहानशा सचिनला पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांना जवळ बोलवून फूल दिलं होतं. पाठीवर थाप मारुन 'जाओ..बहुत बडे बनोगे' असं म्हणत त्यांनी शाबासकीची थाप मारली. सचिन यांच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. अनेका कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये सचिन पिळगावकरांनी हा किस्सा सांगितला आहे. 

Web Title: sachin pilgaonkar received national award at the age of 5 pandit jawaharlal nehru impressed after seeing him and gave him a rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.