सचिन करणार अभिनय
By Admin | Updated: January 12, 2015 23:16 IST2015-01-12T23:16:18+5:302015-01-12T23:16:18+5:30
सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतल्यानंतर तो काय काय करणार याची जास्त उत्सुकता होती. पण आता सचिन नवी इनिंग्ज खेळण्यास सज्ज झालाय

सचिन करणार अभिनय
सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतल्यानंतर तो काय काय करणार याची जास्त उत्सुकता होती. पण आता सचिन नवी इनिंग्ज खेळण्यास सज्ज झालाय. सचिनवर लवकरच एक चित्रपट येणार आहे. त्यात स्वत: सचिन अभिनय करताना दिसणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी त्याचे दिग्दर्शन जेम्स एस्किर्न करणार आहेत. क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांना लोळवणारा सचिन पडद्यावर काय करामत करतो ते पाहणे
औत्सुक्याचे ठरेल.