एमएस धोनीमधील दिशा जॅकी चॅन सोबत करणार 'रोमान्स'

By Admin | Updated: October 6, 2016 13:33 IST2016-10-06T13:33:05+5:302016-10-06T13:33:05+5:30

'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातील छोटयाशा भूमिकेतून आपली छाप पाडणारी दिशा पटानी लवकरच...

'Romance' to accompany Jackie Chan in MS Dhoni's direction | एमएस धोनीमधील दिशा जॅकी चॅन सोबत करणार 'रोमान्स'

एमएस धोनीमधील दिशा जॅकी चॅन सोबत करणार 'रोमान्स'

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ६ - 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातील छोटयाशा भूमिकेतून आपली छाप पाडणारी दिशा पटानी लवकरच सुपरस्टार जॅकी चॅन सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 'कुंग फू योगा' चित्रपटात दिशा महत्वपूर्ण भूमिकेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एमएस धोनी चित्रपटात दिशाने धोनीची पूर्वप्रेयसी प्रियंका झा ची व्यक्तीरेखा साकारली आहे. 
 
धोनीला प्रियंका बरोबर विवाह करायचा होता. पण नियतीने ही प्रेम कहाणी पूर्ण होऊ दिली नाही. २००२ साली एका कार अपघातात प्रियंकाचा मृत्यू झाला.  दिशाची या चित्रपटात भूमिका छोटी असली तरी, ती प्रेक्षकांच्या लक्षात रहाते. 'कुंग फू योगा' हा एक बहुभाषिक अॅक्शनपॅक विनोदी चित्रपट आहे. 
 
यात दिशासह अनेक भारतीय कलाकारही आहेत. जिमॅनेस्टीक्समुळे दिशाला हा चित्रपट मिळाला. अॅक्शन सीन करु शकतील अशा अभिनेत्रीचा शोध सुरु होता. ऑडिशनच्यावेळी मला अॅक्शन सीन करणारा का म्हणून विचारले. मी त्यांना माझे जिमॅनेस्टीक्सचे व्हिडीओ पाठवताच त्यांनी माझी निवड केली असे दिशाने सांगितले. स्टॅनली तोंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. जॅकी चॅनला मी हिंदी शिकवते ते मला चीनी गाणी शिकवतात असे दिशाने सांगितले. 
 

Web Title: 'Romance' to accompany Jackie Chan in MS Dhoni's direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.