लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 08:46 AM2024-04-20T08:46:43+5:302024-04-20T08:47:40+5:30

'सिंघम अगेन' मधील दीपिका पदुकोनचा बिनधास्त आणि रावडी अंदाज सर्वांसमोर आलाय. तुम्हीही बघा दीपिकाचा फर्स्ट लूक (deepika padukone, singham again)

Rohit Shetty shares Deepika Padukone's lady singham look on social media | लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा

लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमाची सर्वांना खुप उत्सुकता आहे. हा सिनेमा २०२४ मधील बहुचर्चित सिनेमा म्हणून ओळखला जातोय. रोहित गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमातील कलाकारांचे लूक शेअर करतोय. अशातच रोहितने 'सिंघम अगेन' मधील दीपिका पदुकोणचा लूक शेअर केलाय. 'सिंघम अगेन' मध्ये दीपिकाचा रावडी अंदाज दिसतोय. 

रोहित शेट्टीने काल रात्री दीपिकाचा लूक शेअर केलाय. यात दीपिका अजय देवगणची आयकॉनिक 'सिंघम'' स्टेप करताना दिसतेय. दीपिकाचा हा रावडी अंदाज सर्वांना आवडलाय. डोळ्यांवर गॉगल आणि पोलीस युनिफॉर्ममध्ये दीपिका खुपच छान दिसत आहे. दीपिका सध्या गरोदर असून ती 'सिंघम अगेन'चं शुटींग करत आहे. काहीच दिवसांपुर्वी तिचे सेटवरील फोटो व्हायरल झाले होते.

'सिंघम अगेन' बद्दल सांगायचं तर.. दीपिका पदुकोण सिनेमात झळकणार आहे.  तर दुसरीकडे अजय देवगण सिनेमात पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका, करीना कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Rohit Shetty shares Deepika Padukone's lady singham look on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.