तैमूर नावाला विरोध करणा-यांवर ऋषी संतापले

By Admin | Updated: December 22, 2016 09:20 IST2016-12-22T08:58:10+5:302016-12-22T09:20:36+5:30

ऋषी कपूर यांनी तैमूर नावाला विरोध करणा-यांना ट्विटरच्या माध्यमातून चांगलंच खडसावलं आहे

Rishi Santapale on protesters against the name of Timur | तैमूर नावाला विरोध करणा-यांवर ऋषी संतापले

तैमूर नावाला विरोध करणा-यांवर ऋषी संतापले

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - अभिनेत्री करिना कपूर आई झाल्याचं कळतात सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. सैफ अली खान आणि करिना कपूर यांना आई-वडिल झाल्याच्या शुभेच्छा मिळू लागल्या. पण जेव्हा खान कुटुंबाने आपल्या घराण्याचा नव्या वारसदाराचं नाव तैमून अली खान पतौडी असं ठेवण्यात आल्याचं जाहीर केलं, तेव्हा मात्र सोशल मिडियावर शुभेच्छांचं रुपांतर वादात झालं. अनेकांनी या नावावर आक्षेप घेत खिल्ली उडवली आहे. तर काहींनी तैमूर नाव ठेवण्यावरुन संताप व्यक्त केला आहे. यावेळी काही जणांनी समर्थनदेखील केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता आणि करिना कपूरचे काका ऋषी कपूर यांनी नावाला विरोध करणा-यांना ट्विटरच्या माध्यमातून चांगलंच खडसावलं आहे. 
 
ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकाकारांना उत्तर देत, 'आई-वडिल आपल्या मुलांचं नाव काय ठेवतात याची लोकांना का चिंता असावी ? तुमच्या कामाशी काम ठेवा, याचं तुमच्याशी काही घेणं देणं नाही', खडे बोल सुनावले आहे. इतकंच नाही जे लोक सैफ अली खान आणि करिनाला सल्ले देत सुनावत होते त्यांनाही ऋषी कपूर यांनी सोडलं नाही. 
 
आई-वडिल तैमूरसारखं घाणेरडं नाव कसं काय ठेवू शकतात ? असं ट्विट एका व्यक्तीने केलं होतं. त्यालाही ऋषी कपूर यांनी उत्तर दिलं आहे. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. तुमच्या मुलाचं नाव तर नाही ठेवलं आहे ना. आक्षेप घेणारे तुम्ही कोण असं सांगत ऋषी कपूर यांनी टीकाकाराचं तोंड बंद केलं आहे. 
 
एकीकडे ट्विटरवर तैमूर नावावरुन वाद सुरु असताना कपूर आणि खान कुटुंब मात्र घरात नवीन पाहुणा आल्याचं सेलिब्रेशन करत होतं. 
 

#daddycool

Web Title: Rishi Santapale on protesters against the name of Timur