हॉलीवूड चित्रपटात रिचा
By Admin | Updated: October 21, 2014 00:26 IST2014-10-21T00:26:11+5:302014-10-21T00:26:11+5:30
गेल्या काही दिवसांपासून रिचा चढ्ढाा दावा करीत होती की, तिला एक हॉलीवूड चित्रपट मिळाला आहे

हॉलीवूड चित्रपटात रिचा
गेल्या काही दिवसांपासून रिचा चढ्ढाा दावा करीत होती की, तिला एक हॉलीवूड चित्रपट मिळाला आहे. भारतात जन्मलेले निर्माते मायकल वार्ड ‘बॉम्बरिया’ नावाचा एक चित्रपट बनवत आहेत. हा चित्रपट मुंबईतच शूट केला जाणार आहे. सूत्रांनुसार वार्ड या चित्रपटाचे निर्माते असले, तरी चित्रपट मात्र हिंदीतच बनवला जाणार आहे. चित्रपटात रिचाला पिझ्झा थ्रीडीचा अभिनेता अक्षय ओबेरॉयसोबत साईन करण्यात आले आहे. पिया सुकन्या या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे. वार्ड म्हणाले की, ‘पिया आणि मी मनाने भारतीय आहोत, मुंंबई आमचा अभिन्न भाग आहे. चित्रपटाची कथा एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. रिचा चित्रपटात मूव्ही रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. तिला खोट्या बातम्या तयार करण्याची सवय असते, तर दुसरीकडे अक्षय एक मध्यमवर्गीय आयटी प्रोग्रॅमर आहे.’ मायकलच्या मते या चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार चित्रपट मुंबईत शूट केला जाणार असून तो हिंदीत बनवणे गरजेचे आहे.