अ फ्लार्इंग जट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 04:51 PM2016-10-17T16:51:00+5:302016-10-18T15:35:12+5:30

चित्रपटाचा पहिला भाग मनोरंजक आहे. हास्य, विनोद हे बालिश असले तरीही कथा रंगवून सांगितली आहे. फ्लॅशबॅक्स साठी अ‍ॅनिमेशन चांगल्यारीत्या वापरले आहेत.

अ फ्लार्इंग जट | अ फ्लार्इंग जट

अ फ्लार्इंग जट

googlenewsNext
Release Date: August 25,2016Language: हिंदी
Cast: टायगर श्रॉफ, अमृता सिंग, के. के. मेनन, जॅकलिन फर्नांडिस, नाथन जोन्स.
Producer: बालाजी मोशन्स पिक्चरDirector: रेमो डिसुझा
Duration: 2 तास 31 मि.Genre:
लोकमत रेटिंग्स
n style="color: rgb(128, 0, 128);">जान्हवी सामंत

अ फ्लार्इंग जट तुम्हाला आवडेल की नाही, हे तुमच्या वयावर अवलंबून आहे. थोडा स्पायडरमॅन, थोडा सुपरमॅन, थोडा हल्क, थोडा क्रिश आणि थोडा सिंग इज ब्लिंग घेऊन बनला आहे, अ फ्लार्इंग जट. सगळ्या सुपरहिरो फिल्म्ससारखे एका गरीब बिचाऱ्या बावळट हिरोला एक चमत्कारिक शक्ती मिळते. जिच्यामुळे तो पापाचा अंत करून आपल्या प्रेयसीचे मन जिंकतो, अशी या चित्रपटाची साधी, सोपी सुपरहिरो स्टोरी आहे. अमन (टायगर श्रॉफ) एक बावळट मार्शल आर्ट शिक्षक असतो. त्याच्या शाळेतील एक शिक्षिका कीर्ती (जॅकलिन फर्नांडिस) वर त्याचे खूप प्रेम असते. पण सांगायचे धैर्य नसते. अमनचे वडील खूप शूर असतात आणि त्यांच्या धाडसामुळे समाजात फ्लार्इंग जट हा किताब त्यांना मिळालेला असतो. अमनच्या आईला (अमृता सिंग) सतत खंत असते की, तो आपल्या वडिलांएवढा धैर्यवान नाही. त्याच्या घराजवळील एक पावन वृक्ष आणि त्या बाजूच्या जमिनीवर मल्होत्रा (के. के. मेनन) या उद्योजकाचा डोळा असतो. या माय-लेकांचा काटा काढण्यासाठी तो राका (नाथन जोन्स) म्हणून एका नराधमाला आणतो. अमनला सुपरहिरो शक्ती कशी येते, ही शक्ती मिळाल्यानंतर तो काय करतो आणि शीख धर्माची शिकवण घेऊन तो राकाचा नाश कसा करतो आणि समाजाला पर्यावरण संरक्षणावर कसा धडा देतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे. पहिल्या दिवशी पहिल्या शोला बरीच मुले आणि आई-वडिलांची गर्दी दिसली. चित्रपटाचे कथानक, त्यातील विनोद, नाट्य, कसरती आणि मारधाड हे सगळे लहान मुलांच्या आवडीप्रमाणे आहे. मुख्य फोकस टायगरच्या व्यक्तिमत्त्वावर आहे. आधी भित्रा पण सुपरहिरो झाल्यानंतरही त्याचा घाबरटपणा दर्शकांना आवडतो. अधिक उंचीची भीती असते म्हणून फ्लार्इंग जट गाद्यांच्या उंचीवरच उडत असतो. ‘बेटा जरा बाजार से आते आते लौकी ले आना’ असं फ्लार्इंग जटची आई त्याला सांगते. तो जातोही बिचारा. टायगर सुपरहिरोच्या अवतारात फिट्ट बसतो. त्याची प्रकृती, मार्शल आर्ट स्टंट आणि नृत्य छानपैकी जमले आहे. चालणे, बोलणे आणि नृत्य प्रकारातून टायगरमध्ये हृतिक रोशनचा भास होतो. पात्र विसंगत असले तरी फार खटकत नाही. त्याच्या भोळेपणाच्या विरुद्ध के. के. मेननचा स्वार्थी खलनायक आणि नाथन जोन्सचा क्रूरपणा अगदी पूरक आहे. अमृता सिंगही एक खाष्ट पण प्रेमळ आईची भूमिका चांगली निभावते.चित्रपटाचा पहिला भाग मनोरंजक आहे. हास्य, विनोद हे बालिश असले तरीही कथा रंगवून सांगितली आहे. फ्लॅशबॅक्स साठी अ‍ॅनिमेशन चांगल्यारीत्या वापरले आहेत. शीख धर्माचा इतिहास आणि त्याच्या सिद्धांतांची पण माहिती दिली आहे. रेमो स्टाईल ट्रेडमार्कमध्ये चित्रपट एकदम मसालेदार आणि सनसनाटी झाला आहे. शेवटचा पाऊण तास मात्र खूप कंटाळवाणा झाला आहे. कदाचित एवढा ताणला नसता तर चित्रपटात आणखी मजा आली असती. 
शेवटी काय, जरुर बघा अ फ्लार्इंग जट, पण मुलं बरोबर असतील तरच.

Web Title: अ फ्लार्इंग जट

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.