क्रिकेटर झहीर खानसोबतच्या नात्याचा सागरिकाने केला खुलासा
By Admin | Updated: February 9, 2017 11:35 IST2017-02-09T10:25:14+5:302017-02-09T11:35:04+5:30
'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

क्रिकेटर झहीर खानसोबतच्या नात्याचा सागरिकाने केला खुलासा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. हेजल कीच आणि युवराज सिंह यांच्या लग्नसोहळ्यात आणि त्यानंतरही सागरिका आणि झहीर अनेक एकत्र दिसले आहेत. मात्र दोघंही जाहीरपणे आपल्या नात्यावर बोलताना टाळत आहेत.
मात्र, एका मुलाखतीदरम्यान सागरिकाने झहीरसोबतच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. झहीरबाबत प्रश्न विचारला गेल्यानंतर तिने सांगितले की, 'आता इतकेच सांगेन की मी सध्या खूप चांगल्या स्पेसमध्ये आहे. खूश आहे. मी कधीही आपल्या खासगी आयुष्यातील कोणतीही गोष्ट जाहीर केली नाही, अगदी सोशल मीडियावरदेखील नाही.
खासगी आयुष्याबाबत मला चर्चा नकोय. यापुढे सागरिका असेही म्हणाली की, झहीर खानबाबत मला खूप आदर आहे. तुम्ही विचारण्याआधीच सांगते की झहीर माझा आगामी सिनेमा इरादा बॉक्सऑफिसवर रिलीज झाल्यानंतर पाहणार आहेत'.
दरम्यान, सागरिका सध्या तिचा आगामी सिनेमा 'इरादा'चे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. या सिनेमामध्ये नसरुद्दीन शाह, अर्शद वारसी आण दिव्या दत्ता यांचीही प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा 17 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.