'उडता पंजाब'च्या शीर्षकामधून 'पंजाब' शब्द काढून टाका - सेन्सॉर बोर्ड
By Admin | Updated: June 6, 2016 21:02 IST2016-06-06T20:54:26+5:302016-06-06T21:02:01+5:30
प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या 'उडता पंजाब' हा चित्रपट अडचणीत सापडला आहे, चित्रपटाच्या शीर्षकामधून पंजाब शब्द काढून टाका असा आदेश सेन्सॉर बोर्डाने दिला आहे

'उडता पंजाब'च्या शीर्षकामधून 'पंजाब' शब्द काढून टाका - सेन्सॉर बोर्ड
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ : प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या 'उडता पंजाब' हा चित्रपट अडचणीत सापडला आहे, चित्रपटाच्या शीर्षकामधून पंजाब शब्द काढून टाका असा आदेश सेन्सॉर बोर्डाने दिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या रवयामुळे कधाचीत चित्रपटाचे नावच बदलावे लागण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे चित्रपटातील ८९ कटस ही सांगीतले आहेत. चित्रपट १७ जूनला रिलीज होणार असून याचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. ‘उडता पंजाब’ मध्ये पंजाबला ड्रगमुळे होणारा त्रास दाखवण्यात आला आहे. अभिषेक चौबे यांचा हा तिसरा चित्रपट असून, दिग्दर्शक म्हणून याअगोदर ‘ईश्किया’, ‘देढ इश्किया’ हे चित्रपट त्यांनी साकारले आहेत.
चित्रपटात शाहिद कपूर, करिना कपूर-खान, आलिया भट्ट आणि पंजाबी सुपरस्टार दिलजित दोसंग यांच्या प्रमुख भुमीका आहेत.