‘खलनायक’चा रिमेक
By Admin | Updated: October 12, 2014 00:29 IST2014-10-12T00:29:57+5:302014-10-12T00:29:57+5:30
ऐंशी आणि नव्वदच्या दशकात सुभाष घई यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. रिमेकच्या या युगात आता त्यांच्या चित्रपटांचे रिमेक बनवले जात आहेत.

‘खलनायक’चा रिमेक
>ऐंशी आणि नव्वदच्या दशकात सुभाष घई यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. रिमेकच्या या युगात आता त्यांच्या चित्रपटांचे रिमेक बनवले जात आहेत. सलमान खान ‘हीरो’चा रिमेक बनवणार आहे, तर करण जोहर आणि रोहित शेट्टी ‘राम-लखन’च्या रिमेकच्या तयारीला लागले आहेत. आता ‘खलनायक’चा रिमेक बनवण्याची चर्चा सुरू आहे. संजय लीला भन्साळी यांनी सुभाष घई यांना भेटून तशी इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत या विषयावर त्यांची बरीच चर्चा झाल्याचे कळते. काही महिन्यांपूर्वी घईंनी इच्छा व्यक्त केली होती की खलनायकची पुनर्निर्मिती व्हायला हवी. सूत्रंनुसार दोन्ही निर्माते खलनायकच्या रिमेकसाठी तयार आहेत. वेळ आल्यावर कलाकार आणि दिग्दर्शकाची घोषणा केली जाणार आहे. 21 वर्षापूर्वी म्हणजेच 1993 मध्ये रिलीज झालेल्या खलनायकमध्ये ज्ॉकी श्रॉफ, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.