रिमेकला लागला ब्रेक

By Admin | Updated: September 25, 2015 03:15 IST2015-09-25T03:15:39+5:302015-09-25T03:15:39+5:30

सलमान खान निर्मित हीरो चित्रपटाच्या दुरवस्थेचे परिणाम म्हणून की काय अचानक चित्रपटांच्या रिमेकला ब्रेक लागला आहे. सुमारे अर्र्धा डझनहून अधिक रिमेक चित्रपट थंड बस्त्यात पडले आहेत.

Remake break break | रिमेकला लागला ब्रेक

रिमेकला लागला ब्रेक

सलमान खान निर्मित हीरो चित्रपटाच्या दुरवस्थेचे परिणाम म्हणून की काय अचानक चित्रपटांच्या रिमेकला ब्रेक लागला आहे. सुमारे अर्र्धा डझनहून अधिक रिमेक चित्रपट थंड बस्त्यात पडले आहेत. सुभाष घई यांच्या राम लखनचा रिमेकही टळला आहे. या रिमेकसाठी सुभाष घई व करण जौहरची कंपनी मैदानात उतरली होती व रोहित शेट्टीकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. करण जौहर यांच्या कंपनीच्या सूत्रानुसार सध्या या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. रोहित शेट्टी यांनीदेखील तसे संकेत दिले आहेत. सध्या शाहरूख खानसोबत दिलवालेच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या रोहितला यानंतर अजय देवगणसोबत नवीन चित्रपट सुरू करायचा आहे. तो लवकरच ‘गोलमाल-४’चे काम सुरू करेल.
रि लायन्सने प्रकाश मेहरांच्या नमक हलालच्या रिमेकचे अधिकार मोठ्या किमतीत खरेदी केले आहेत. अक्षय कुमारला घेऊन हा रिमेक तयार करण्याचा विचार होता. मात्र आता अक्षयनेदेखील आपला विचार बदलला आहे. एका प्रसिद्ध निर्मात्याने प्रियंका चोप्रासोबत ‘चौदवी का चाँद’च्या रिमेकच्या योजनेवर काम सुरू केले होते. प्रियंका यामुळे खूप उत्साहित होती. मात्र आता निर्मात्याचा मूड बदलला. फरहान अख्तरच्या कंपनीने रमेश सिप्पी यांच्या ‘सीता और गीता’च्या रिमेकचे अधिकार खरेदी केले होते. कतरिनाने याला हिरवा कंदील दिला होता. मात्र आता या प्रश्नावर काही बोलण्यात ती तयार नाही. संजय दत्तच्या प्रोडक्शन कंपनीकडून अमिताभ बच्चनच्या ‘सत्ते पे सत्ता’चे अधिकार खरेदी करण्यात आले होते. संजय दत्तसोबत माधुरी दीक्षित किंवा करिश्मा कपूरचे नाव पुढे आले. मात्र ही योजनाही बंद करण्यात आली. आलिया भट्ट आपले पिता महेश भट यांच्या ‘दिल है के मानता नहीं’च्या रिमेकमध्ये काम करू इच्छिते. आमिर खान-पूजा भट्ट यांचा हा चित्रपट काही वर्षांपूर्वीच्या राज कपूर - नर्गीस यांच्या ‘चोरी-चोरी’चा रिमेक होता. टी सीरिजकडून सांगण्यात आले आहे की, सध्या याच्या रिमेकचा विचार नाही. सुभाष घई यांच्या कर्ज चित्रपटाच्या रिमेकमध्ये हात होरपळलेली टी सिरीज कंपनीही आता घाई करू इच्छित नाही. एकता कपूरच्या बाबतीतही वृत्त होते की, राजकुमार कोहली यांच्या ७०च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘नागीन’च्या रिमेकचे अधिकार खरेदी केलेत. अशीही बातमी आली होती की या रिमेकचे काम लगेच सुरू होणार आहे. मात्र आता ‘नागीन’चा रिमेकसुद्धा होणार नाही. जानकारांच्या मते, बॉलिवूड सध्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकवर जास्त लक्ष केंद्रित करीत आहे.
- ंल्ल४्न.ं’ंल्ल‘ं१@’ङ्म‘ें३.ूङ्मे

Web Title: Remake break break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.