रीमा लागू ‘नटसम्राट’मधून बाहेर?
By Admin | Updated: March 22, 2015 23:26 IST2015-03-22T23:26:55+5:302015-03-22T23:26:55+5:30
अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या बहुचर्चित ‘नटसम्राट’ सिनेमातून अभिनेत्री रीमा लागू बाहेर पडल्याची चर्चा आहे.

रीमा लागू ‘नटसम्राट’मधून बाहेर?
अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या बहुचर्चित ‘नटसम्राट’ सिनेमातून अभिनेत्री रीमा लागू बाहेर पडल्याची चर्चा आहे. रीमा लागू यांचीही या चित्रपटात नाना पाटेकर यांच्या इतकीच महत्त्वाची व्यक्तिरेखा होती. मात्र भूमिकेची लांबी कमी करण्यात आल्याने तसेच नानाच्या तुलनेत भूमिकेला कमी वाव मिळत असल्याचे लक्षात आल्याने रीमा या चित्रपटातून बाहेर पडल्या अशी चर्चा आहे.