रणबीरने तोडला सलमान खानचा हा रेकॉर्ड
By Admin | Updated: February 12, 2017 17:10 IST2017-02-12T17:10:52+5:302017-02-12T17:10:52+5:30
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरने दबंग सलमान खानचा रेकॉर्ड मोडला आहे. 1994 मध्ये सलमान-माधूरीचा आलेला चित्रपट हम आपके हैं कौन या चित्रपटात 14 गाणी होती

रणबीरने तोडला सलमान खानचा हा रेकॉर्ड
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरने दबंग सलमान खानचा रेकॉर्ड मोडला आहे. 1994 मध्ये सलमान-माधूरीचा आलेला चित्रपट हम आपके हैं कौन या चित्रपटात 14 गाणी होती. पण रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफचा आगामी जग्गा जासूस'मध्ये तब्बल 29 गाणी आहेत. सध्याच्या घडीला अभिनय करणाऱ्या कलाकारांच सलमान खानच्या चित्रपटात सर्वात जास्त गाणी आहेत असे म्हटले जात होते पण रणबीर कपूरने हा रेकॉर्ड मोडत आपल्या नावी नवीन रेकॉर्ड केला आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफचा आगामी चित्रपट 'जग्गा जासूस' प्रदर्शनासाठी तयार आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डायलॉग कमी आणि गाण्यांचा भरपूर वापर झाल्याचे दिसले. आपण याला म्यूझिकल थ्रिलर म्हणू शकतो. या चित्रपटात तब्बल 29 गाणी आहेत.
या चित्रपटातील गाणी कथा पुढे घेऊन जाणारी असल्याचा खुलासा संगीतकार प्रितम यांनी केला आहे. कॅटरिना आणि रणबीर कपूरसोबत अदाह शर्मा, सयानी गुप्ता, सौरभ शुक्ला यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटींग भारत, थायलंड आणि दक्षिण आफ्रिकेत झाले आहे. 'जग्गा जासूस' 7 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाण्याचा रेकॉर्ड 1932 साली प्रदर्शित झालेल्या इंद्रसभा या चित्रपटाच्या नावे आहे. या चित्रपटात 70 गाणी आहेत.