RCB ने फायनल जिंकताच अभिनेत्याचा लेक रडला, आनंदाच्या भरात डोक्यावर पाणी ओतून घेतलं अन्...; पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:28 IST2025-06-04T11:27:52+5:302025-06-04T11:28:27+5:30
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीने ट्रॉफी नावावर करत अखेर विजयाचा दुष्काळ संपवला. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विजयाचा क्षण साजरा करताना आरसीबी आणि त्यांचे चाहतेही भावुक झाले होते. अनेकांनी जल्लोषात आरसीबीचा विजय साजरा केला. तर विराट कोहलीसाठी काही जण भावुक झाले.

RCB ने फायनल जिंकताच अभिनेत्याचा लेक रडला, आनंदाच्या भरात डोक्यावर पाणी ओतून घेतलं अन्...; पाहा व्हिडिओ
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीने ट्रॉफी नावावर करत अखेर विजयाचा दुष्काळ संपवला. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विजयाचा क्षण साजरा करताना आरसीबी आणि त्यांचे चाहतेही भावुक झाले होते. अनेकांनी जल्लोषात आरसीबीचा विजय साजरा केला. तर विराट कोहलीसाठी काही जण भावुक झाले.
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा लेकही आरसीबीने फायनल जिंकताच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आयपीएलच्या फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर कट्टर आरसीबी फॅन असलेल्या पुष्पाचा लेक अयानला अश्रू अनावर झाले. याचा व्हिडिओ अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यामध्ये अयान भावुक झाल्याचं दिसत आहे. जमिनीवर झोपून तो रडत आहे. त्यानंतर आनंदाच्या भरात त्याने पाणीही डोक्यावर ओतून घेतलं. "अयान भावनिक झाला आहे. विराट कोहली फॅन बॉय मोमेंट...सो क्यूट चिन्नी बाबू", असं म्हणत अल्लू अर्जुनने लेकाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या फायनल सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरले. खास गोष्ट ही की, १८ क्रमांकाची जर्सी घालून मिरवणारा किंग कोहलीला १८ व्या हंगामात IPL ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न साकार झाले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.