रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 09:46 IST2025-10-04T09:46:01+5:302025-10-04T09:46:55+5:30

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी एंगेजमेंट केली आहे. कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत या जोडीने नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे.

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda secretly got engaged, will take seven steps on this day | रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

Vijay Rashmika Engagement: विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांनी एंगेजमेंट केली आहे. कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत या जोडीने नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. मात्र, याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्या लग्नाची तारीखही जवळपास निश्चित झाली आहे. टॉलिवूडच्या सूत्रांनुसार, साउथ स्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी शुक्रवारी गुपचूप साखरपुडा केला आहे. हा साखरपुडा दोन्ही कुटुंबीय आणि दोघांच्या केवळ जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झाला. अद्याप त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आलेले नाहीत. 

विजय आणि रश्मिका दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही कधीही आपले नाते अधिकृतपणे जाहीर केले नाही किंवा सार्वजनिकरित्या याबद्दल बोलले नाही, पण त्यांनी अफवांना वाव देणारे पुरेसे संकेत दिले आहेत. या दोघांना अनेकदा रेस्टॉरंटमध्ये फिरताना आणि अनेक वेळा व्हॅकेशन्स एन्जॉय करताना पाहिले गेले आहे. मात्र, त्यांनी आतापर्यंत पूर्णपणे गोपनीयता राखली आहे. अखेर, साखरपुड्याच्या बातमीने या सर्व अफवांना विराम मिळेल.

विजय आणि रश्मिकाचे चित्रपट
विजय देवरकोंडाने 'पेली चूपुलु', 'अर्जुन रेड्डी' आणि 'गीता गोविंदम' सारखे हिट चित्रपटात काम केले आहे. दुसरीकडे, रश्मिका 'पुष्पा' फ्रँचायझी आणि 'ॲनिमल' सारखे पॅन-इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन नॅशनल क्रश बनली. तिने कन्नडमध्ये 'किरिक पार्टी' मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर तेलुगू आणि बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले. या दोघांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' मध्ये एकत्र काम केले आहे. ते लवकरच तिसऱ्यांदा पुन्हा एकत्र काम करणार आहेत.

लवकरच करणार लग्न
या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे की, ते पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. लवकरच याची अधिकृत घोषणा झाल्यावर अधिक माहिती समोर येईल.

Web Title : रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा ने गुपचुप की सगाई, जल्द शादी?

Web Summary : विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना ने कथित तौर पर एक निजी समारोह में सगाई कर ली। अफवाह है कि यह जोड़ा डेटिंग कर रहा है और अगले फरवरी में शादी कर सकता है। विवरण का इंतजार है।

Web Title : Rashmika Mandanna and Vijay Deverakonda secretly engaged, wedding soon?

Web Summary : Vijay Deverakonda and Rashmika Mandanna reportedly engaged in a private ceremony. The couple, rumored to be dating, may tie the knot next February. Details awaited.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.