रणवीर सिंगची ‘गंजी’, फरहानचे लिनन जॅकेट्स
By Admin | Updated: July 2, 2015 04:04 IST2015-07-02T04:04:04+5:302015-07-02T04:04:04+5:30
‘दिल धडकने दो’ आणि ‘एबीसीडी-२’ या चित्रपटातून बॉलीवूडच्या फॅन्सना एथिनिक वेअर्सची कमाल दिसून आलीय. शॉर्ट स्कर्ट्स ते विविध ड्रेसच्या माध्यमातून येत्या काळात

रणवीर सिंगची ‘गंजी’, फरहानचे लिनन जॅकेट्स
‘दिल धडकने दो’ आणि ‘एबीसीडी-२’ या चित्रपटातून बॉलीवूडच्या फॅन्सना एथिनिक वेअर्सची कमाल दिसून आलीय. शॉर्ट स्कर्ट्स ते विविध ड्रेसच्या माध्यमातून येत्या काळात अनेकांचा वॉर्डरोब भरलेला दिसेल. प्रियंकाची पांढरी पलाझ्झो पँट चर्चेचा विषय बनली असून, अशी किमान एक तरी पँट आपल्याकडे असली पाहिजे, असे तरुणींना वाटू लागले आहे. अनुष्काचे कॅज्युअल दिसणे साऱ्यांनाच भावतेय. रणवीर सिंगची ‘गंजी’ आणि कॉटन पँट, अनिल कपूर आणि फरहान अख्तरची लिनन जॅकेट्स आकर्षित करताहेत.