१००० कोटी पार! 'धुरंधर'ची कमाई सुसाट, २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:26 IST2025-12-26T13:21:42+5:302025-12-26T13:26:51+5:30
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. जाणून घ्या सिनेमाच्या कमाईबद्दल

१००० कोटी पार! 'धुरंधर'ची कमाई सुसाट, २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी
सध्या 'धुरंधर' सिनेमाची भारतात नव्हे तर जगभरात चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा कमाईच्या बाबतीत अनेक सिनेमांना मागे टाकत आहे. 'धुरंधर' रिलीज होऊन आता २१ दिवस झाले आहेत. पण तीन आठवडे उलटून गेल्यावरही 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. इतकंच नव्हे 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींहून जास्त व्यवसाय केला आहे. जाणून घ्या 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट
'धुरंधर'ची एकूण कमाई किती?
ख्रिसमस सुट्टीच्या दिवशी 'धुरंधर' सिनेमाने २८.६० कोटींची तगडी कमाई केली आहे. याशिवाय जगभरात 'धुरंधर'च्या कमाईचा डंका वाजतोय. 'धुरंधर'ने २१ व्या दिवशी भारतात ६५० कोटींची कमाई केली आहे. तर भारताबाहेरील देशांमध्ये सिनेमाने २१७ कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे 'धुरंधर' सिनेमाने एकूण कमाईत १००० कोटींचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे जगभरात 'धुरंधर'चीच हवा असल्याच चित्र स्पष्ट झालं आहे.
रणवीर सिंग,अक्षय खन्नाची भूमिका असलेला 'धुरंधर' सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत होता. सिनेमा रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीपासूनच सिनेमाच्या कमाईचा आलेख वाढताना दिसला. सिनेमात रणवीर सिंग, अक्षय खन्ना यांच्यासोबत आर.माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'धुरंधर'चा पार्ट २ १९ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.