‘पद्मावती’मधील रणवीरचा लूक झाला लिक!

By Admin | Updated: April 16, 2017 03:14 IST2017-04-16T03:14:36+5:302017-04-16T03:14:36+5:30

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावती’ या चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंग याचा लूक लिक झाला आहे. रणवीरसह, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर हेही चित्रपटात

Ranveer becomes 'Padmavati' look! | ‘पद्मावती’मधील रणवीरचा लूक झाला लिक!

‘पद्मावती’मधील रणवीरचा लूक झाला लिक!

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावती’ या चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंग याचा लूक लिक झाला आहे. रणवीरसह, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर हेही चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या रणवीरचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र त्याचा हा लूक रिअल आहे की फेक हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु रणवीरचा लूक बघून संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांच्या स्टाइलशी साम्य साधणारा असल्याचे स्पष्ट होते. चित्रपटात रणवीर अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, या लिक झालेल्या लूकमध्ये रणवीरने अतिशय टाइट कपडे परिधान केलेले आहेत. राजा-महाराजांच्या या वेशभूषेत रणवीर एखाद्या महाराजासारखा दिसत आहे. डोळ्यात सुरमा आणि हातात तलवार असलेला रणवीर खूपच रुबाबदार दिसत आहे.

Web Title: Ranveer becomes 'Padmavati' look!