"यश चोप्रांचा पुनर्जन्म झालाय आणि ते..." राणी मुखर्जी सासऱ्यांबद्दल काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 17:57 IST2026-01-23T17:56:51+5:302026-01-23T17:57:36+5:30

राणी मुखर्जीने तिचे दिवंगत सासरे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते दिवंगत यश चोप्रा यांच्याबद्दल एक खुलासा केलाय.

Rani Mukerji calls her daughter Adira reincarnation of Yash Chopra | "यश चोप्रांचा पुनर्जन्म झालाय आणि ते..." राणी मुखर्जी सासऱ्यांबद्दल काय म्हणाली?

"यश चोप्रांचा पुनर्जन्म झालाय आणि ते..." राणी मुखर्जी सासऱ्यांबद्दल काय म्हणाली?

Rani Mukerji On Yash Chopra : बॉलिवूडची 'राणी' अशी ओळख असलेली अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या सुंदर आवाजामुळेच लाखो हृदयांवर राज्य करते.   सध्या राणी तिच्या 'मर्दानी ३' चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे 'राजा की आयेगी बारात' चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या राणीनं सिनेसृष्टीत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. यशराज फिल्म्सच्या स्टुडिओमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राणी मुखर्जीने आपल्या तीन दशकांच्या अभिनय प्रवासावर भाष्य केलं. यावेळी राणीने तिचे दिवंगत सासरे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते दिवंगत यश चोप्रा यांच्याबद्दल एक खुलासा केलाय.

 राणीच्या मते, यश चोप्रा यांचा पुनर्जन्म झालाय.  राणीला तिची लेक आदिराच्या सवयी आणि तिची सर्जनशीलता पाहून तिला तिचे सासरे यश चोप्रा यांची आठवण येते. राणी म्हणाली, "कधीकधी मला खरोखर असं वाटतं की यश यांचा आदिराच्या रूपाने पुनर्जन्म झाला आहे. ती एक उत्तम कथाकार आहे आणि खूप छान लिहिते. तिची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता पूर्णपणे तिचे आजोबा यश चोप्रा आणि वडील आदित्य चोप्रा यांच्यासारखीच आहे".

राणीने सांगितले की, आदिरा तिची खूप मोठी चाहती आहे. मात्र, तिने अजूनही राणीचा सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है' पूर्ण पाहिलेला नाही. यामागचे कारण म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीलाच राणीच्या पात्राचा मृत्यू होतो आणि ते पाहून आदिरा खूप दुःखी होते. मात्र, जेव्हा राणीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा आदिराने टीव्हीसमोर उड्या मारून आपला आनंद साजरा केला होता". 

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी एप्रिल २०१४ मध्ये इटलीमध्ये केवळ १२ लोकांच्या उपस्थितीत त्यांनी अत्यंत साधेपणाने लग्न केले होते. लग्नाच्या १२ वर्षांनंतरही हे जोडपे बॉलिवूडमधील सर्वात 'प्रायव्हेट' कपल म्हणून ओळखले जाते. आदिरा यावर्षी १० वर्षांची होत असून, तिला सुरुवातीपासूनच मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवण्यात आले आहे.

Web Title : रानी मुखर्जी को बेटी में यश चोपड़ा का पुनर्जन्म दिखता है।

Web Summary : रानी मुखर्जी मानती हैं कि उनकी बेटी आदिरा यश चोपड़ा का पुनर्जन्म हैं, क्योंकि उसमें कहानी कहने और रचनात्मकता के गुण हैं। आदिरा रानी को प्यार करती है, लेकिन 'कुछ कुछ होता है' फिल्म नहीं देखती क्योंकि उसमें रानी के किरदार की मौत हो जाती है। रानी और आदित्य चोपड़ा निजी जीवन जीते हैं।

Web Title : Rani Mukerji feels Yash Chopra reborn in her daughter.

Web Summary : Rani Mukerji believes her daughter Adira is Yash Chopra's reincarnation, citing her storytelling and creativity. Adira loves Rani but avoids 'Kuch Kuch Hota Hai' due to her character's death. Rani and Aditya Chopra maintain a private life.