संजय दत्त बनण्यासाठी तयार रणबीर
By Admin | Updated: October 17, 2014 00:41 IST2014-10-17T00:41:10+5:302014-10-17T00:41:10+5:30
संजय दत्तच्या जीवनात एवढे चढ-उतार आहेत की, त्याच्या जीवनावर एखादा चित्रपट सहज बनवला जाऊ शकतो.

संजय दत्त बनण्यासाठी तयार रणबीर
संजय दत्तच्या जीवनात एवढे चढ-उतार आहेत की, त्याच्या जीवनावर एखादा चित्रपट सहज बनवला जाऊ शकतो. संजयचा खास मित्र असलेला दिग्दर्शक राजकुमार हिराणी सध्या संजयच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात हा विषय आहे. आता त्यांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्यास घेतली असल्याचे कळते. संजय तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते हा चित्रपट बनवतील. विशेष म्हणजे संजय दत्तची भूमिका निभावण्यासाठी रणबीर कपूरचाही होकार मिळाला आहे. सूत्रंनुसार रणबीरने राजकुमार हिराणींना संजय दत्त बनण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.