रणबीर कपूरमुळे संजूबाबाचे शेजारी त्रस्त, शूटिंग थांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 17:36 IST2017-04-14T17:36:02+5:302017-04-14T17:36:02+5:30
संजय दत्तच्या जीवनावर आधारीत सिनेमाच्या शुटींगमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूर व्यस्त आहे. पण या सिनेमाचं चित्रीकरण थांबवावं लागलं

रणबीर कपूरमुळे संजूबाबाचे शेजारी त्रस्त, शूटिंग थांबवली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - संजय दत्तच्या जीवनावर आधारीत सिनेमाच्या शुटींगमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूर व्यस्त आहे. पण या सिनेमाचं चित्रीकरण थांबवावं लागलं आहे. रणबीर संजय दत्तच्या पाली हिल येथील घराबाहेर शूटिंग करत होता मात्र, संजय दत्तच्या शेजा-यांनी याला विरोध केला आणि याविरोधात निदर्शनं केली.
मुंबई मिररच्या वृत्तनुसार, निदर्शनं सुरू झाल्यानंतर रणबीर संजयच्या घरात निघून गेला तर राजकुमार हिराणी यांनी निदर्श करणा-यांची माफी मागितली आणि शूटिंग थांबवण्यासाठी 10 मिनिटांची वेळ मागितली.
सकाळी 6 वाजता शूटिंग सुरू झाली होती, मात्र 3 ते 4 तासांनंतर शेजा-यांनी विरोध करायला सुरूवात केली आणि शूटिंग सुरू असलेल्या स्पॉटवरच गाड्या पार्क केल्या. चित्रीकरणादरम्यान परिसरात प्रचंड घाण करण्यात आली होती, पूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता आणि चित्रीकरणाच्या युनिटने पेपर प्लेट. चहाचे कप आदी वस्तू रस्त्यावर कुठेही फेकल्या होत्या, त्यामुळे शेजारी त्रस्त होते.
शेजा-यांनी निदर्शनाला सुरूवात केल्यानंतर हिरानी यांना स्वतः येवून माफी मागायला लागली त्यानंतरच शेजारी शांत झाले. उर्वरित शूटिंग आता संजूबाबाच्या घरात होणार असून त्यासाठी दत्तच्या घरातच सेट तयार करण्यात आला असल्याची माहिती आहे.
संजूबाबाच्या जीवनावर आधरित हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे हे अजून जाहीर करण्यात आलेलं नाही.