रणबीर-कॅटचा साखरपुडा ?
By Admin | Updated: May 6, 2015 00:10 IST2015-05-06T00:10:50+5:302015-05-06T00:10:50+5:30
रणबीर-कतरिनाने आपले प्रेमसंबंध जाहीरपणे सर्वांसमोर मान्य केल्यानंतर कपूर कुटुंबामध्ये आता या नात्याला विवाहाच्या बेडीमध्ये अडकवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

रणबीर-कॅटचा साखरपुडा ?
रणबीर-कतरिनाने आपले प्रेमसंबंध जाहीरपणे सर्वांसमोर मान्य केल्यानंतर कपूर कुटुंबामध्ये आता या नात्याला विवाहाच्या बेडीमध्ये अडकवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. काही आठवड्यांपूर्वी वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये संपूर्ण कपूर कुटुंबासह रणबीर-कतरिना एकत्र दिसले होते. कतरिनाची संपूर्ण कपूर कुटुंबाशी ओळख करून देण्यासाठी रणबीरने ही डिनर डिप्लोमसी केल्याची चर्चा होती. रणबीर-कतरिनाचे नाते अधिकृत करण्यासाठी या महिन्याच्या शेवटाला कपूर कुटुंब एक कार्यक्रम आयोजित करणार असल्याची चर्चा आहे.