रणबीर आणि रणवीरची टक्कर
By Admin | Updated: October 29, 2014 01:16 IST2014-10-29T01:16:21+5:302014-10-29T01:16:21+5:30
पुढच्या वर्षी ािसमसला रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. याच दिवशी रणबीर कपूरचा ‘तमाशा’ हा चित्रपट रिलीज होणार

रणबीर आणि रणवीरची टक्कर
पुढच्या वर्षी ािसमसला रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. याच दिवशी रणबीर कपूरचा ‘तमाशा’ हा चित्रपट रिलीज होणार असून, रणवीरचा ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपटही याच दिवशी रिलीज करण्याचे ठरविण्यात आले आहे. निर्माता साजीद नादियाडवालाने ‘तमाशा’ चित्रपटासाठी ािसमसची बुकिंग केली आहे. दुसरीकडे संजय लीला भन्साळींनीही त्यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या ड्रीम प्रोजेक्टसाठी हीच तारीख निश्चित केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांत रणबीर आणि रणवीरच्या हिरोईनच्या भूमिकेत दीपिका पदुकोण दिसणार आहे. त्यामुळे दीपिकाचा मुकाबलाही सरळ दीपिकाशीच असेल. तज्ज्ञांच्या मते हे दोन्ही चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ बाकी आहे. त्यामुळे चित्रपटांच्या रिलीजच्या तारखांमध्ये बदल करता येऊ शकतो; पण असा बदल केला नाही, तर दोन्ही चित्रपटांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल.