रजनीकांतच्या मुलीला सहमतीने हवा घटस्फोट
By Admin | Updated: December 23, 2016 16:33 IST2016-12-23T15:38:26+5:302016-12-23T16:33:33+5:30
प्रतिज्ञापत्र कौटुंबिक न्यायालयात सादर झाले. यावेळी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सौदर्या आणि अश्विन रामकुमार दोघेही न्यायालयात उपस्थित होते.

रजनीकांतच्या मुलीला सहमतीने हवा घटस्फोट
tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 23 - रजनीकांतची मुलगी सौदर्याचा लवकरच घटस्फोट होणार असून सौदर्या आणि तिचा पती अश्विन रामकुमार परस्परसहमतीने विभक्त होणार आहेत. शुक्रवारी यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र कौटुंबिक न्यायालयात सादर झाले. यावेळी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सौदर्या आणि अश्विन रामकुमार दोघेही न्यायालयात उपस्थित होते.
सर्वप्रथम 17 सप्टेंबरला सौदर्या घटस्फोट घेणार असल्याची बातमी समोर आली. अश्विन रामकुमार उद्योगपती असून 2010 साली दोघांचा मोठया थाटामाटात विवाह झाला होता. त्यावेळी या विवाहाची भरपूर चर्चा झाली होती. या दांम्पत्याला एक वर्षाचा मुलगाही आहे.
सप्टेंबर महिन्यात कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्याआधीच्या सहा महिन्यांपासून दोघे स्वतंत्र रहात असल्याची सौदर्याने टि्वटरवरुन माहिती दिली होती.