शिवानी सोनारचा थाटात पार पडला साखरपुडा; 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्यासोबत केली एंगेजमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 08:28 IST2024-04-10T08:28:02+5:302024-04-10T08:28:34+5:30
Shivani sonar: शिवानीने तिच्या साखरपुड्याचा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.

शिवानी सोनारचा थाटात पार पडला साखरपुडा; 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्यासोबत केली एंगेजमेंट
'राजा रानीची गं जोडी' या गाजलेल्या मालिकेतून नावारुपाला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार. उत्तम अभिनय आणि लोभसवाणा चेहरा यांच्या जोरावर लोकप्रियता मिळवणारी शिवानी नुकतीच एंगेज झाली आहे. शिवानीने 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्यासोबत साखरपुडा केला आहे.
शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या खास दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एंगेजमेंट करतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शिवानीचा भावी आयुष्याचा जोडीदार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
शिवानीने लोकप्रिय अभिनेता अंबर गणपुले (Ambar ganpule)याच्यासोबत साखरपुडा केला आहे. अंबर लोकप्रिय अभिनेता असून त्याने रंग माझा वेगळा या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत त्याने आदित्य ही भूमिका साकारली आहे.
दरम्यान, शिवानी 'सिंधूताई माझी माई' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर, अंबरने 'लोकमान्य' या मालिकेत गोपाळ गणेश आगरकर ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.