राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:03 IST2025-08-14T18:01:11+5:302025-08-14T18:03:17+5:30

Shilpa Shetty Raj Kundra met Premanand Maharaj : भेटीवेळी वातावरण आध्यात्मिक होते. दोघांनीही हात जोडून प्रेमानंद महाराजांना ऐकले आणि त्यांच्या मनातील भावनाही व्यक्त केल्या...

Raj Kundra offered a kidney as soon as he took blessings, what did Premanand Maharaj say after listening You will be surprised to know | राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सक्रिय असते. शिल्पाची ईश्वरावरही खूप श्रद्धा आहे. हे तिच्या पोस्टमधूनही अनेक वेळा दिसून येते. ती नुकतेच तिचा पती राज कुंद्रासोबत संत प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावन येथे पोहोचली होती. भेटीवेळी वातावरण आध्यात्मिक होते. दोघांनीही हात जोडून प्रेमानंद महाराजांना ऐकले आणि त्यांच्या मनातील भावनाही व्यक्त केल्या. दरम्यान, राज कुंद्राच्या एका विधानाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

शिल्पा शेट्टीने विचारला असा प्रश्न - 
यावेळी महाराज म्हणाले, परमेश्वराने आपल्याला वृंदावन येथे पाठवले, आपण येथे आलात, तर नाम जप करण्याचा काही तर नियम घ्या. आपण नाम-जप करता? यावर शिल्पा शेट्टीने प्रश्न केला की, आपणच आम्हाला सांगा की आम्ही काय करायला हवे. यावर प्रेमानंद महाराजांनी त्यांना राधा-राधा जप कसा करावा हे सांगितले. 

संभाषण पुढे सरकत असताना महाराज म्हणाले, आपल्या दोन्ही किडन्या निकामी आहोत. मी नेहमी प्रसन्न असतो. मृत्यूचे अजिबात भय नाही. प्रेमानंद महाराजांचे हे शब्द ऐकून राज कुंद्राने लगेचच आपली इच्छा व्यक्त केली.

माझी १ किडनी  नावावर -
राज म्हणाला, 'मी गेल्या २ वर्षांपासून आपल्याला फॉलो करत आहे. येथे येण्यापूर्वी माझ्या मनात जो काही प्रश्न यायचा, त्याचे उत्तर मला दुसऱ्याच दिवशी आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने मिळायचे. माझ्याकडे कुठलाही प्रश्न नाही. पण मला एवढे सांगायचे आहे की, जर मी कधी आपल्या कामी येऊ शकलो तर माझी एक किडनी आपल्या नावे."

यावर काय म्हणाले प्रेमानंद महाराज ? -
हे ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक आणि खुद्द शिल्पालाही आश्चर्यचकित झाली. यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, "नाही... नाही... तुम्ही स्वस्थ राह, प्रसन्न राहा. मी इश्वराच्या कृपेने अत्यंत स्वस्थ आहे. जोवर त्यांचे बोलावणे येत नाही, तेवर ही किडनी आपल्याला घेऊन जाणार नाही. सत्य हे आहे की, जेव्हा बोलावणे येते, तेव्हा कुणालाही जावेच लागते. पण आम्ही आपल्या सद्भावनांचा मनापासून स्वीकारतो." हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

Web Title: Raj Kundra offered a kidney as soon as he took blessings, what did Premanand Maharaj say after listening You will be surprised to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.