राहुलचे ‘मराठी’ चित्रपटात पदार्पण
By Admin | Updated: October 28, 2015 11:47 IST2015-10-27T23:57:40+5:302015-10-28T11:47:49+5:30
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा एवढीच त्याची ओळख सीमित नाही, तर ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोसह त्याच्याच स्वयंवराच्या शोच्या माध्यमातून ‘राहुल महाजन

राहुलचे ‘मराठी’ चित्रपटात पदार्पण
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा एवढीच त्याची ओळख सीमित नाही, तर ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोसह त्याच्याच स्वयंवराच्या शोच्या माध्यमातून ‘राहुल महाजन’ हे नाव कायमच छोट्या पडद्यावर चर्चेत राहिलेले आहे. एका नेत्याचा मुलगा असल्याने त्याने काही केले तरी चर्चा तो होगीही बॉस!
आता हेच पाहा ना, बहीण पूनम महाजनसारखे राजकारणाच्या वाटेवर पाऊल न टाकता त्याने चक्क मराठी चित्रपटाकडे आपला मोर्चा वळविला आहे. निर्माता-दिग्दर्शक राज राठोड यांच्या ‘लॉर्ड आॅफ शिंगणापूर’ या आगामी चित्रपटात नायकाच्या जवळील मित्राच्या भूमिकेमध्ये त्याचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या वेळी अभिनेत्री वर्षा उसगावकरसह राहुल महाजनदेखील उपस्थित होता. या दोघांसमवेत वैभवी शांडिल्य आणि मिलिंद गुणाजी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.