राधिका आपटेच्या फोबियाच्या ट्रेलरला उदंड प्रतिसाद
By Admin | Updated: April 29, 2016 16:38 IST2016-04-29T16:38:22+5:302016-04-29T16:38:22+5:30
राधिका आपटेच्या फोबिया या सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमाच्या ट्रेलरनं सध्या सोशल मीडियावर चांगलीच बाजी मारली आहे

राधिका आपटेच्या फोबियाच्या ट्रेलरला उदंड प्रतिसाद
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - राधिका आपटेच्या फोबिया या सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमाच्या ट्रेलरनं सध्या सोशल मीडियावर चांगलीच बाजी मारली आहे. जीवाचा थरकाप उडवणारा हा ट्रेलर सध्या चांगलाच गाजत आहे. सोमवारी लाईव्ह करण्यात आलेलं हे ट्रेलर आत्तापर्यंत सुमारे 12 लाख लोकांनी बघितलं आहे.
फेसबुक व ट्विटरसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही हे ट्रेलर चांगलंच व्हायरल झालं आहे. राधिका आपटेच्या कामाचं नेहमीप्रमाणे कौतुक करण्यात येत असून घरात राहण्याची भीती आहे, तर बाहेर जाण्याचीगी दहशत अशा कात्रीत सापडलेली राधिका वेगळ्याच रोलमध्ये या टित्रपटात दिसत आहे.
लोकांच्या मनात असलेल्या वेगवेगळ्या फोबियांना या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. मेहक असं कलाकार पात्र राधिका रंगवत असून घरात राहणं शक्य नाही आणि बाहेर जाता येत नाही, अशा कात्रीत ती सापडली आहे.
इरॉस इंटरनॅशनल व नेक्स्ट जेन फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून पावन क्रिपलानीचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.