राधिकाचा फोबियामधील फर्स्ट लूक प्रदर्शित
By Admin | Updated: April 23, 2016 01:26 IST2016-04-23T01:26:33+5:302016-04-23T01:26:33+5:30
मराठी इंडस्ट्री व बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री राधिका आपटेचा आगामी चित्रपट फोबियाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे

राधिकाचा फोबियामधील फर्स्ट लूक प्रदर्शित
मराठी इंडस्ट्री व बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री राधिका आपटेचा आगामी चित्रपट फोबियाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. राधिका ही विकी रजानीच्या सायकोलॉजिकल थिमवर आधारित फोबिया चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पवन कृपलानी यांनी दिग्दर्शित केला आहे. राधिका सध्या सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी काबिल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तामिळ गँगस्टरवर आधारित या चित्रपटाचे शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. या काबिल चित्रपटात राधिका रजनीकांतच्या बायकोची भूमिका साकारत आहे. तर काही दिवसांपूर्वी ती अमेय वाघ व निपुण या कलाकारांसोबतची मराठीतील पहिली वेबसाइट असलेली कास्ंिटग काउटच्या माध्यमातूनदेखील चर्चेत होती.