राधाचा झाला अपघात
By Admin | Updated: July 8, 2017 04:59 IST2017-07-08T04:59:22+5:302017-07-08T04:59:22+5:30
राधाची भूमिका साकारणाऱ्या रुपल नंद चित्रीकरण संपवून दुचाकीवरून घरी जात असताना तिचा अपघात झाला. तिच्या उजव्या हाताला

राधाचा झाला अपघात
राधाची भूमिका साकारणाऱ्या रुपल नंद चित्रीकरण संपवून दुचाकीवरून घरी जात असताना तिचा अपघात झाला. तिच्या उजव्या हाताला आणि पायाला जबर लागले आहे. पायातून कळा येत होत्या. तिला नीट उभेही राहता येत नव्हते. मात्र, रुपल स्वत: फिजिओथेरपिस्ट असल्याने तिने या परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. न घाबरता ती तशीच गाडी चालवत घरी गेली. उजव्या पायाचा स्नायू दुखावला असल्याचे तिच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी मालिकेचे चित्रीकरण ठरलेले होते. तिच्या न जाण्याने चित्रीकरण रद्द करावे लागले असते. त्यामुळे स्वत:चे थोडे फार उपचार करून ती पुन्हा चित्रीकरणाला उपस्थित राहिली होती असे समजते.