दीपिका-अनुष्कामध्ये ‘रेस’

By Admin | Updated: April 10, 2016 01:32 IST2016-04-10T01:32:21+5:302016-04-10T01:32:21+5:30

अनुष्का शर्माचे करिअर सध्या जोमात आहे. ‘सुल्तान’मुळे तिला आता बिग बजेट चित्रपटही मिळत आहेत. मागील वर्षी ‘एनएच १०’ आणि ‘दिल धडकने दो’ अशा चित्रपटांमध्ये तिने आपले वेगळे

'Race' in Deepika-Anushka | दीपिका-अनुष्कामध्ये ‘रेस’

दीपिका-अनुष्कामध्ये ‘रेस’

अनुष्का शर्माचे करिअर सध्या जोमात आहे. ‘सुल्तान’मुळे तिला आता बिग बजेट चित्रपटही मिळत आहेत. मागील वर्षी ‘एनएच १०’ आणि ‘दिल धडकने दो’ अशा चित्रपटांमध्ये तिने आपले वेगळे महत्त्व सिद्ध केले. यशराज फिल्म्सचा ‘सुल्तान’आणि करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’हा चित्रपट मिळाल्याने ती बेहद
खूश आहे. आमीर खानसोबत ‘पीके’, सलमानसोबत ‘सुल्तान’मध्ये तिने क ाम केले पण आता ‘रब ने बना दी जोडी’च्या को-स्टार शाहरूख खानसोबत पुन्हा एकदा तिला काम करायला मिळणार आहे. ती त्या काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी तिन्ही खानसोबत काम केले आहे. तिला इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटामध्ये किंग खानसोबत काम करायला मिळणार आहे. याअगोदर तिला इम्तियाज अलीचा ‘तमाशा’ चित्रपट मिळाला होता. पण नंतर तो दीपिका पदुकोणला देण्यात आला. इम्तियाजच्या ‘लव्ह आज कल’मध्येही डिप्पीने काम केले आहे. ‘तमाशा’ची कथा अनुष्काला फारशी आवडली नाही. त्यामुळे तिने तो चित्रपट नाकारला. दीपिका-अनुष्का या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. सध्या डिंपल क्वीन दीपिका हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. ती तिकडे बिझी असल्याने इम्तियाजने अनुष्काला घेतले आहे. पण, या दोघींच्या रेसमध्ये अनुष्का दीपिकाला मागे टाकते की काय, असा प्रश्न पडला आहे.

Web Title: 'Race' in Deepika-Anushka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.