2 MADच्या मंचावर अवतरली ‘क्वीन’ कंगना रणौत

By Admin | Updated: February 19, 2017 03:37 IST2017-02-19T03:37:38+5:302017-02-19T03:37:38+5:30

2 MADमहाराष्ट्राचा अस्सल डान्सरच्या मंचावर. 'रंगून' हा कंगनाचा आगामी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. त्याचनिमित्ताने तिने या कार्यक्रमात हजेरी लावली

The Queen 'Kangana Ranaut' emerged on the stage of 2 MAD | 2 MADच्या मंचावर अवतरली ‘क्वीन’ कंगना रणौत

2 MADच्या मंचावर अवतरली ‘क्वीन’ कंगना रणौत

2 MADमहाराष्ट्राचा अस्सल डान्सरच्या मंचावर. 'रंगून' हा कंगनाचा आगामी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. त्याचनिमित्ताने तिने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. क्वीन, तनु वेड्स मनु अशा सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी आणि बॉलिवूडची क्वीन म्हणजेच कंगना राणावतची 2 MAD च्या सेटवर धमाकेदार एन्ट्री झाली. 2 MADद्वारे कंगना पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर एका डान्स शोमध्ये आली आहे. या खास एपिसोडमध्ये स्पर्धकांनी कंगनाच्या गाण्यावर डान्स करून तिला सरप्राईझ दिलं. महाराष्ट्रात असलेले भन्नाट टॅलेंट पाहून कंगनाही थक्क झाली. 2 MADमहाराष्ट्राचा अस्सल डान्सरच्या सेटवर येऊन कंगना खूपच खुश होती.
त्यावर ती म्हणाली, ‘मी खूप खुश आहे या मंच्यावर येऊन. स्पर्धक खूप टॅलेंटेड आहेत, त्यांच्या डान्समध्ये मॅडनेस आहे. हा डान्स शो आहे आणि डान्स म्हटलं की, मॅडनेस हा आलाच. माझ्या मते प्रत्येक क्रियेटिव्ह कामामध्ये MADness असावाच लागतो.’

Web Title: The Queen 'Kangana Ranaut' emerged on the stage of 2 MAD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.