प्रियांकाच्या ‘गोल्ड’ स्टाइलला दीपिकाने केले आणखी ‘बोल्ड’
By Admin | Updated: January 18, 2017 03:00 IST2017-01-18T03:00:57+5:302017-01-18T03:00:57+5:30
गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर गोल्डन रंगाचा व्ही-नेक ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते

प्रियांकाच्या ‘गोल्ड’ स्टाइलला दीपिकाने केले आणखी ‘बोल्ड’
प्रियांका चोप्राने नुकतेच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर गोल्डन रंगाचा व्ही-नेक ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते. डार्क लिपिस्टिकमधील तिचा हा रेड कार्पेटवरील गोल्डन अवतार फॅशन जगतात खूपच गाजतोय. प्रियांकाची अशी तारीफ होत असताना दीपिका तरी कशी मागे राहणार. मुंबईत पार पडलेल्या तिच्या पहिल्या हॉलीवूडपटाच्या प्रीमियरमध्ये तिने गोल्डन रंगाचाच गाऊन परिधान केला; परंतु तिच्या ड्रेसचे व्ही-नेक बऱ्यााच खाली जाणारे होते. प्रियांकाच्या लो व्ही-नेकला आणखी बोल्ड रुप देत दीपिकाने व्हेरी लो व्ही-नेक गाऊन घालून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. दोघींनी एकाच स्टाईलचे व रंगाचे ड्रेस घातल्यामुळे तुलना होणे स्वभाविक आहे. प्रथमच गोल्डन ग्लोब्समध्ये सहभागी होणाऱ्या प्रियांकाने राल्फ लॉरेनने डिझाइन केलेला चकचकीत गोल्डन गाउन रेड कार्पेटसाठी घातला होता. दीपिकाचा हा आऊटफिट खूपच बोल्ड होता. या गाउनमध्ये दीपिकाची नेकलाइन स्पष्टपणे दिसत होती. दीपिका या गाउनमध्ये अतिशय स्टनिंग अंदाजात दिसली.