हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय

By Admin | Updated: September 16, 2016 08:21 IST2016-09-16T04:54:28+5:302016-09-16T08:21:25+5:30

भारताला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेऊन पोचवणाऱ्या प्रियंका चोप्राविषयी सर्वांना अभिमान वाटायला हवा असा पराक्रम प्रियंका चोप्राच्या नावावर झाला आहे.

Priyanka is the first Indian to make this record | हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय

हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ : भारताला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेऊन पोचवणाऱ्या प्रियंका चोप्राविषयी सर्वांना अभिमान वाटायला हवा असा पराक्रम प्रियंका चोप्राच्या नावावर झाला आहे. टेलव्हिजनवर जगातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत प्रियंकाला आठवं स्थान मिळालं आहे. हा विक्रम नोंदवणारी प्रियंका पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे. फोर्ब्सकडून जाहीर करण्यात येणाऱ्या जगात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टिव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियांका आठव्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी एबीसीच्या क्वांटिकोमधून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने या मालिकेतून १.१ कोटी डॉलर एवढी कमाई केली आहे.

विक्रमी ७३ कोटी रुपयांच्या मानधनासह बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंकाने आठवं स्थान मिळवलं आहे. जगात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या हायपेड अभिनेत्रींची यादी फोर्ब्सकडून काल जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रियंका आठव्या स्थानावर आहे. सोफिया वर्जारा ही हॉलिवूड अभिनेत्री २८८ कोटी रुपये एवढ्या मानधनासह पहिल्या स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपास आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या क्वांटिको या सिरीजच्या पुढील भागाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. क्वांटिकोच्या पहिल्या सिझननंतर क्वांटिको २ मध्येही ती अ‍ॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे. नुकताच तिचा हॉलिवूडच्या द न्यू रॉयल रिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. टाइम मासिकाने हे स्पष्ट केले आहे की, हॉलिवूडची ही रॉयल्टी यादी वंशानुसार न निवडता चांगल्या कामगिरीवर या यादीतील नावे निवडण्यात आली आहेत.

यादीतील टॉप १० अभिनेत्री

सोफिया वर्जारा २८८ कोटी
कॅली कुओको १६४ कोटी
मिंडी कॅलिंग १०० कोटी
मॅरिस्का हार्टिगे ९७ कोटी
अ‍ॅलेन पॉम्पियो ९७ कोटी
कॅरी वॉशिंग्टन ९० कोटी
स्टॅना कॅटिक ८० कोटी
प्रियंका चोप्रा ७३ कोटी
जुलियाना मारगुलिस ७० कोटी
ज्यूली बॉवेन ६७ कोटी

Web Title: Priyanka is the first Indian to make this record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.