प्राचार्य म्हणाले, कॉलेजला येऊ नकोस! - रविना
By Admin | Updated: April 11, 2016 00:59 IST2016-04-11T00:59:37+5:302016-04-11T00:59:37+5:30
मी ज्या कॉलेजमध्ये शिकायचे तेथे अॅडमिशन घेणाऱ्यांची तूफान गर्दी वाढली. अखेर प्राचार्यांनी मला बोलावले व कॉलेजला नियमित न येता एक्सटर्नल विद्यार्थिनी म्हणून शिक्षण पूर्ण करा

प्राचार्य म्हणाले, कॉलेजला येऊ नकोस! - रविना
1991 साली मी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच ‘पत्थर के फूल’मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मी रातोरात स्टार झाले. त्यानंतर अगदी ओळीने ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘अंदाज अपना अपना’ अशा सुपरहीट चित्रपटांची रांग लागली. परंतु याचा एक भलताच परिणाम समोर आला. मी ज्या कॉलेजमध्ये शिकायचे तेथे अॅडमिशन घेणाऱ्यांची तूफान गर्दी वाढली.
अखेर प्राचार्यांनी मला बोलावले व कॉलेजला नियमित न येता एक्सटर्नल विद्यार्थिनी म्हणून शिक्षण पूर्ण करा
असा सल्ला दिला, अशी अफलातून माहिती प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने दिली. सीएनएक्शी बोलताना रविनाने आयुष्यातील अनेक गमती-जमती शेअर केल्या.
रविना पुढे म्हणाली, आठवीपर्यंत मी एकदम साधारण लाजरीबुजरी मुलगी होते. आपण कसे दिसतो, आपल्याबद्दल लोक काय विचार करतील या विचाराने
मी आत्मविश्वास गमावला होता. वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर येत असूनही मी हात वर करत नसे. मी
जर हात वर केला तर सगळे जण माझ्याकडे पाहतील. आपल्या दिसण्यावरून चिडवतील याची भीती वाटायची. त्यामुळे माझे शालेय जीवन खूप छान नव्हते. आता ‘स्टार’ म्हटल्यावर अशा गोष्टी तर होणारच ना. असो.
पण रविना तुला पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहण्यास सर्व चाहत्यांना नक्कीच आवडेल!