‘प्रेम रतन’ करिअरचा बिगेस्ट हाय -सोनम
By Admin | Updated: November 8, 2015 02:32 IST2015-11-08T02:32:38+5:302015-11-08T02:32:38+5:30
अभिनेत्री सोनम कपूर प्रथमच बॉलीवूडच्या दबंग स्टार सलमान खानसोबत ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये काम करीत आहे. तिला हा चित्रपट म्हणजे तिच्या करिअरचा बिगेस्ट हाय वाटतो

‘प्रेम रतन’ करिअरचा बिगेस्ट हाय -सोनम
अभिनेत्री सोनम कपूर प्रथमच बॉलीवूडच्या दबंग स्टार सलमान खानसोबत ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये काम करीत आहे. तिला हा चित्रपट म्हणजे तिच्या करिअरचा बिगेस्ट हाय वाटतो. ‘प्रेम रतन’विषयी तिचा अनुभव सांगताना ती म्हणते, की सलमानसोबत काम करण्याचा माझा अनुभव फारच उत्तम होता. त्यात सूरज बडजात्या म्हणजे काय दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. मला फार आनंदी आणि अभिमानी वाटतंय की मी सलमानसोबत प्रथमच आणि एवढे सुंदर काम केले आहे. सोनम क पूरने ‘सावरीया’मधून तिचे पाय फॅशन वर्ल्डकडे बॉलीवूड फॅशनिस्टकडे वळवले. तिने आतापर्यंत दिल्ली ६, आयशा, मौसम, प्लेयर्स, बेवकुफियाँ, डॉली की डोली एवढे फ्लॉप चित्रपट आणि भाग मिक्खा भाग, रांझणा सारखे क्रिटिकली हिट चित्रपट दिले आहेत. मात्र ‘प्रेम रतन’ या सर्वांपैकी अगदीच वेगळा आहे. ‘अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी’ असा हा चित्रपट असून ,१२ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये येईल.