प्रीती झिंटा अडकली विवाहबंधनात
By Admin | Updated: March 1, 2016 14:46 IST2016-03-01T14:46:02+5:302016-03-01T14:46:02+5:30
अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर विवाहबंधनात अडकली असून बॉयफ्रेंड जेन गुडेनफसोबत तिने लग्न केलं आहे

प्रीती झिंटा अडकली विवाहबंधनात
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १ - अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर विवाहबंधनात अडकली असून बॉयफ्रेंड जेन गुडेनफसोबत तिने लग्न केलं आहे. लॉस ऐंजेलिसमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. हा विवाहसोहळा अत्यंत खासगी पद्धतीने करण्यात आला असून लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईकच उपस्थित होते.
फिल्मफेअर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार २९ फेब्रुवारीला हा विवाहसोहळा पार पडला. एप्रिल महिन्यात मुंबईत परतल्यानंतर सेलिब्रेशन करण्यासाठी प्रीती झिंटा मोठा कार्यक्रम ठेवणार आहे. या कार्यक्रमाला मित्र, नातेवाईकांसह बॉलिवूड सेलिब्रेटीजना आंमत्रित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.