इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 14:52 IST2026-01-11T14:51:59+5:302026-01-11T14:52:26+5:30

Prashant Tamang Death: प्रशांत तमांगने प्रसिद्ध ‘पाताल लोक’ वेब सीरीजमध्ये काम केले असून, सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली!

Prashant Tamang Death: Indian Idol-3 winner Prashant Tamang passes away | इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prashant Tamang Death: मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग याचे आज(11 जानेवारी 2026) रोजी वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रशांतच्या अचानक जाण्याने संगीत सृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 जानेवारीच्या पहाटे प्रशांत तमांग याला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. प्रशांतच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण करत, प्रशांतच्या आवाज आणि साधेपणाची आठवण करून दिली.

संघर्षातून यशापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

प्रशांत तमांगचा जन्म 4 जानेवारी 1983 रोजी दार्जिलिंग येथे झाला. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. कुटुंबाचा आधार बनण्यासाठी त्याने कोलकाता पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी स्वीकारली. याच काळात ते पोलिस ऑर्केस्ट्रामध्ये गायन करत होता.

इंडियन आयडलमुळे मिळाली ओळख

2007 साली प्रशांत तमांगने इंडियन आयडल सीझन 3 साठी ऑडिशन दिले आणि हाच क्षण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. आपल्या साध्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि भावस्पर्शी गायनामुळे त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आणि अखेर विजेतेपद पटकावले. या विजयानंतर त्याने ‘धन्यवाद’ हा संगीत अल्बम प्रदर्शित केला. देश-विदेशात अनेक लाईव्ह शो करत त्याने स्वतःला एक यशस्वी प्लेबॅक व लाईव्ह परफॉर्मर म्हणून स्वतःला सिद्ध केले.

अभिनय क्षेत्रातही ठसा

संगीतासोबतच प्रशांत तमांगने अभिनयातही आपली चुणूक दाखवली. 2010 मध्ये त्याने नेपाली सुपरहिट चित्रपट ‘गोरखा पलटन’ मधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर Angalo Yo Maya Ko, Kina Maya Ma, Nishani, Pardesi यांसारख्या अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. ‘पाताल लोक 2’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये त्याने स्नायपरच्या भूमिकेत प्रेक्षकांची दाद मिळवली. विशेष म्हणजे, प्रशांत लवकरच सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात झळकणार आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
 

Web Title : इंडियन आइडल 3 के विजेता प्रशांत तमांग का 43 वर्ष की आयु में निधन

Web Summary : इंडियन आइडल 3 के विजेता प्रशांत तमांग का 43 वर्ष की आयु में हृदय गति रुकने से निधन हो गया। एक कांस्टेबल से गायन सनसनी तक, उन्होंने फिल्मों और वेब सीरीज में अभिनय किया, संगीत और प्रदर्शन की विरासत छोड़ गए। वह 'बैटल ऑफ गलवान' में दिखने वाले थे।

Web Title : Indian Idol 3 winner Prashant Tamang passes away at 43.

Web Summary : Prashant Tamang, Indian Idol 3 winner, tragically died at 43 due to a heart attack. From a constable to singing sensation, he acted in films and web series, leaving behind a legacy of music and performance. He was to appear in 'Battle of Galvan'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.