Video: मंजिरीचं ओकचं साडी प्रेम; प्रसाद ओकच्या पत्नीचं साडी कलेक्शन कधी पाहिलंय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 18:55 IST2022-08-10T18:54:23+5:302022-08-10T18:55:10+5:30
Manjiri oak: मंजिरीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तिने प्युअर इरकल साडीमध्ये व्हिडीओ शूट केला आहे

Video: मंजिरीचं ओकचं साडी प्रेम; प्रसाद ओकच्या पत्नीचं साडी कलेक्शन कधी पाहिलंय का?
मंजिरी ओक (Manjiri Oak) हे नाव सध्या कोणत्याही मराठी प्रेक्षकाला नवीन नाही. अभिनेता प्रसाद ओकची (Prasad Oak) पत्नी असलेल्या मंजिरीने कलाविश्वात तिचं स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मंजिरी सोशल मिडियावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून छोट्या उद्योजकांना मदत करते. यात बऱ्याचदा ती साडीच्या ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करताना दिसते. विशेष म्हणजे यातून तिचं साडीप्रेम पाहायला मिळतं. यावेळी मंजिरीने असाच एक व्हिडीओ पोस्ट करत साड्यांवर असलेलं तिचं प्रेम व्यक्त केलं आहे.
मंजिरीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तिने प्युअर इरकल साडीमध्ये व्हिडीओ शूट केला आहे. ही साडी Jarataari या ब्रँडची असून तिचं कलर कॉम्बिनेशन कमालीचं सुंदर असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडीओ शूट करत असताना मंजिरीने त्यावर साजेसा हलकासा मेकअप केला आहे. त्यामुळे ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
दरम्यान, मंजिरी अनेकदा तिच्या साडीच्या कलेक्शनमुळे चर्चेत येत असते. मंजिरीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि स्टाइलच्या साड्या असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे ती अत्यंत सुंदररित्या या साड्या कॅरी करते.