संसदेतही ‘परतु’चे कौतुक
By Admin | Updated: December 6, 2015 03:01 IST2015-12-06T03:01:59+5:302015-12-06T03:01:59+5:30
या जगात कुठेही गेलो तरीही आपल्या माणसांविषयीची ओढ सगळीकडे सारखीच असते. अशीच नात्यांची आपल्या माणसाच्या ॠणानुबंधाची कहाणी ‘परतु’ या मराठी चित्रपटातून पाहायला

संसदेतही ‘परतु’चे कौतुक
या जगात कुठेही गेलो तरीही आपल्या माणसांविषयीची ओढ सगळीकडे सारखीच असते. अशीच नात्यांची आपल्या माणसाच्या ॠणानुबंधाची कहाणी ‘परतु’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. दोन राज्यांतील या ऋणानुबंधाची दखल लोकप्रतिनिधींनी घ्यावी, यासाठी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी खास पुढाकार घेत ‘परतु’ चित्रपटाचा विशेष खेळ संसदेतील सर्व खासदारांसाठी आयोजित केला होता. फिल्म डिव्हिजनच्या आॅडिटोरियममध्ये ही फिल्म दाखवण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र व राजस्थान या दोन राज्यांचा अनोखा मिलाफ या चित्रपटाच्या माध्यमातून फार सुरेखरीत्या दाखवला असून, एक चांगला संदेश प्रभावीपणे मांडल्याबद्दल लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले. इतकेच नाहीतर भविष्यातही अशा चांगल्या चित्रपटांची निर्मिती करावी व त्यासाठी आवश्यक ती सारी मदत संसदेकडून देण्याचं आश्वासन लोकसभेच्या महाजन यांनी या वेळी दिलं. या विशेष खेळाला महाराष्ट्र व राजस्थानचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दिग्दर्शक नितीन अडसूळ म्हणाले, ‘‘चांगला आशय रसिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ‘परतु’ची निर्मिती करण्यात आली. संसदेच्या प्रतिनिधींना याची दखल घ्यावीशी वाटली व त्यानिमित्ताने हा विशेष खेळ व्हावा, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.’’ एका शोधाच्या निमित्ताने दोन राज्यांमध्ये निर्माण होणारी जवळीक व प्रेमाचा अनोखा संदेश हा चित्रपट देतो. हा संदेश प्रत्येकाला अंतर्मुख करेल, अशी भावना अडसूळ यांनी व्यक्त केली.